सलीमचा उंट

जेम्स, चित्र: अलिकी, मराठी : अश्‍विनी बर्वे

सलीम एक छोटा मुलगा होता. तो मोरक्‍्कोत सलीमचा ञउ्ट

आपल्या आईवडिलां बरोबर एका शेतावर राहत होता.

सलीमला प्राणी फार आवडत. त्याचे एक पाळलेले गाढव जेम्स, चित्र: अलिकी, होते - मिस्टर मूनलाईट. एक दिवस एक निर्दयी उंट मराठी : अश्‍विनी बर्वे व्यापाऱ्याला एक उंट खूप त्रास देत होता. कोणीही त्या व्यापाऱ्याला मदत करायला पुढे आले नाही. तेव्हा सलीम पळत गेला आणि त्याने त्या खतरनाक उंटाचा गळा धरला.मग सलीमने त्या उंटाच्या कानात प्रेमाने काहीतरी सांगितले. तेव्हा उंट एकदम शांत झाला. उंट व्यापाऱ्याने त्या खतरनाक उेटापासून सुटका करून घेण्यासाठी तो उंट सलीमला देवून टाकला. सलीमने त्या उंटाला - ओमरला धीराने आणि प्रेमाने आपल्या काबूत आणले.मग त्याने आपले गाढव मिस्टर मूनलाइट आणि उंट ओमरला खत नांगरण्यासाठी बांधलं. त्याच्यामुळे सल्रीमचा परिवार खूप खुश झाला. आता सल्नीमच्या वडिलांना शेत नांगरण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. आपण आजही मोरक्को मध्ये उंट आणि गाढवाच्या साहय्याने नांगरणी करतांना पाहू शकतो.

एक अरबी मुलगा होता. त्याचे नाव सलीम होता. तो दहा वर्षाचा होता. तो मोरक्को मध्ये एका मातीच्या घरात आपल्या अब्बा, अम्मी आणि मिस्टर मूनलाईट बरोबर राहत होता. मिस्टर मूनलाईट हा मैत्रीपूण रीतीने राहणारे एक गाढव होते. त्याचे नाक नेहमी ओले असायचे. तो हलक्या पिवळ्या रंगाचा एकदम चांदणी सारखा त्याचा रंग होता.

एक दिवस सलीमने गव्हाचे शेत नांगरण्यासाठी मदत केली. त्याने नांगराचे मागची

दातेरी जमिनीत जोरात दाबली. सल्रीमच्या | अब्बांनी नांगर एका दोरीने ओढला. या टी | पर मेहनतीमुळे त्याचे अब्बा लवकर थकले. जेव्हा

दोघं आराम करायला बसले, तेव्हा सलीम त्याच्या अब्बांना म्हणाला की, जर त्यांच्या ऐवजी मिस्टर मूनलाईट गाढवाने जर नांगर ओढले तर शेताची नांगरणी सोप्पी होईल.

वडील त्याच्याकडे हसून बघत म्हणाले, “ठीक आहे सल्रीम.पण गाढव वस्तू ओढत नाही तर ते आपल्या पाठीवर ओझे वाहून नेतात.”

पण सल्ीमला विश्‍वास होता की जर त्यानी मिस्टर मूनलाईटला सांगितले तर गाढव नक्की नांगर ओढेल.

वी...” बे ४” ही बची क्ट १५५ > क.

क. 27 - > अवक विक 7” र्‍ ठे “>.” व्ह रि १.'« “४ शं रि “३ ८“&> & र्‌ कं शी >> “७. १. $$ “. ती .. २. >> का | शि > की ल्क > 1 ्ो <<. .. क. ग्‌

त्यानंतर सलीम पळत घरी गेला आणि तो नागरण्यासाठी गाढवाला शेतात घेवून आला. सलीमच्या अब्बांनी नांगर ओढण्याची दोरी मिस्टर मूनलाईटच्या गळ्यात बांधली. मग अब्बांनी मागची कडी धरली. दातेरं जमिनीत दाबलं आणि सलीमने आपल्या पांढऱ्या गाढवाला सांगितले, “चल मिस्टर मूनलाईट, ओढ!” मिस्टर मूनलाईटने खूप प्रयत्न केले. त्याने पूर्ण दम लावून ओढले. नांगर कधी जमिनीवर घसरले तर कधी थांबले. पण ते पुढे गेले

नांगराने खूप खाल्रीवर नांगरणी झाली. त्यामुळे बी पेरणं शक्‍य नव्हते. शेवटी सलीमचे अब्बा म्हणाले, “हे बघ सलीम ते एक चांगले गाढव आहे. पण तो नांगर ओढण्यासाठी उपयोगाचे नाही. तू त्याला परत घेवून जा.”

दुसऱ्या दिवशी सलीम आणि त्याच्या अब्बांना काही कामासाठी बाजारात जायचे होते. ते दोघे मिस्टर मूनलाईटवर बसून बाजारात रवाना झाले.सलीम पुढे बसला आणि अब्बा त्याच्या मागे. गावाच्या जवळ जाताच त्यांना उंटाच्या बाजारातून जोरजोरात आवाज यायला लागले. मोठया आवाजात ओरडण्याचा, किंचाळण्याचा, कण्हाचा आवाज येवू लागला. सलीम आणि त्याचे अब्बा ओरडण्याचे, किचाळण्याचे कारण शोधण्यासाठी तिथे पोहचले. तोपर्यंत तिथे गर्दी जमा झाली होती.

ऊंट-व्यापारी मुस्तकाला एक खतरनाक उंट खूप त्रास देत होता. मुस्तफाच्या हातात एक चामड्याचा चाबूक होता, त्याने तो उंटाला मारत होता. उंट आपले दोन्ही पाय पुढे करून आपल्नी लांब मान आणि मोठे पिवळे लांब दात मालकाला दाखवत होता. उंटाने आपल्या * मालकाच्या डोळ्यात थुंकण्याचा सुद्धा प्रयत्न केला. जेव्हा उंट रागात असतो तेव्हा तो नेहमीच असे करतो.

वि)

पण गर्दीला त्याचे बोलणे ऐकून हसू आले. कोणीही त्याच्या मदतीला आले नाही. सलीमला सुद्धा मुस्तफाची फिकीर नव्हती. सगळ्यांना माहित होते मुस्तफा उंटाच्या बरोबर अतिशय वाईट वागतो.

पण सल्रीमला प्राण्याबद्दल खूप प्रेम होते- खास करून बत्तमिज आणि रागीट जनावरांचे. त्यांना काबूत आणण्याची आणि त्यांच्याशी मैत्री करण्याची युक्‍ती त्याला माहित होती. उंटाची अजून पिटाई व्हावी असे त्याला वाटत नव्हते. म्हणून तो मुस्तफाकडे बघून ओरडला, “मी तुला मदत करेन!” यानंतर सलीम त्या खतरनाक उंटाजवळ पळत गेला. तो उंट त्यात्रा मारेल असा विचारही त्याने केला नाही. किंवा त्याच्या टोकदार दातांनी तो त्याचे तुकडे तुकडे करू शकता असता. या उलट सल्ीमने घाईने एका दोरीने त्या उंटाला पकडले आणि त्याला जोरात झटका दिला. त्यामुळे उंट लगेच थांबला. नंतर सलीमने उंटाच्या मुलायम गळ्यावर प्रेमाने थोपटले. मग त्याने उंटाचे डोके खाली ओढले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितले. त्या शब्दाने उंट लगेच शांत झाला..

क्ट

वि - 111111)

सलीमने खतरनाक उंटाला शांत केले हे पाहून मुस्तफा पळायचे थांबला. मग मुस्तफाने सलीमला म्हटले, “आज जर तू नसता तर मी जिवंत राहिलो नसतो. त्या भयंकर उंटाने ओमरने मला मारून टाकले असते. तो पूर्ण आफ्रिकेतील सगळ्यात भयंकर उंट आहे. त्या उंटाला आता कोणी माझ्याकडून खरेदी करणार नाही. कोणीही माझ्याकडून तो उंट घेणार नाही.

“तुम्ही तो उंट मल्ला द्याल का?” सत्रीमने उत्सुकतेने विचारले. "मला तो उंट आवडला आहे.”

मुस्तफा म्हणाला, “घे घे!आजपासून तो उंट तुझा आहे!” हे ऐकून सलीम खूप खुश झाला.

“आपले खूप आभार, मुस्तफा साहेब!” सलीम म्हणाला. त्यानंतर सलीम आणि त्याचे अब्बा उंट ओमरला घेवून आपल्या घरी आले.

मिस्टर मूनलाइट पुढे चालू लागला आणि त्यावर सलीमचे अब्बा बसले.

ऊंट, मिस्टर मूनलाइट च्या मागे मागे निघाला.उंटाला एका दोरीने बांधले होते. जिला सलीमच्या अब्बाने आपल्या हातात पकडले होते. उंटावर सलीम बसला हलत-डोलत तो घराकडे निघाला. आज सलीम खूप खुश होता.

पण शेवटी सल्लीमने त्याच्या कानात काही सांगितले. त्याने उंट शांत झाला. त्यानंतर ओमरने नांगर ओठू लागला. सुरुवातीला हळू हळू मग तो जोरात नांगरू लागला.

उंटाच्या मागे मागे नांगर नांगरत जावू लागले. सलीमने मागे वळून पाहिले. जमिनीत नांगरल्यानंतर एक खोल सरी तयार झाली होती.

“अब्बा, बघा! ओमर नांगरतो आहे,” सलीम ओरडला..

हळूहळू ते पूर्ण शेतात लांबवर गेले. एका बांधापासून-दुसऱ्या बांधापर्यंत.

मग ते परत आले, पहित्ली सरीच्या

जवळ दुसरी सरी करण्यासाठी.

सुरुवातीच्या जागी परत आल्यानंतर सलीमचे अब्बा म्हणाले, “चल खूप झाले,आता थोड्या वेळ आपण आराम करू.”

मग त्यांनी शेताकडे नीट पाहिले.खासकरून त्या दोन सऱ्या, ज्या ओमरने आत्ता नांगरल्या होत्या. त्यांना लगेच एक चूक समजली.सऱ्या सरळ नव्हत्या तर नागमोड्या होत्या. वळवळणाऱ्या सापासारख्या.

“बघ सलीम,” अब्बा म्हणाले. “म्हणून म्हणतो उंट शेताची नांगरणी करू शकत नाही.”

सलीम म्हणाला. “ठीक आहे अब्बा, आत्ता मला कळले उंट नांगरण्याचे काम का करू शकत नाही. कारण उंट नांगराला एका सरळ रेषेत ओठू शकत नाही.”

“योग्य बोललास,” सलीमचे अब्बा म्हणाले. “बघ उंट गाढवासारखे चालत नाही. गाढव आधी डावा पुढचा पाय आणि मग उजवा मागचा पाय उचलतो. मग डावा पुढचा पाय आणि मग उजवा मागचा पाय टाकतो. पण उंट आपले दोन्ही डावे पाय एकाच वेळी टाकतो, आणि मग दोन्ही उजवे पाय पुढे टाकतो. म्हणून उंट जोराच्या वाऱ्यात डावा-उजवा असे हलतो. म्हणून उंटाला सरळ रेषेत चालणे अवघड आहे.”

1 शश

दुःखी होवून सलीमने ओमरला नांगराच्या बाहेर काढले. आणि त्याला तो आपल्या मातीच्या घराकडे घेवून गेला. जिथे मिस्टर मूनलाईट बसलेला होता. सलीम तिथे घराच्या सावलीत बसला, आपली पाठ भिंतीला टेकून बसला. आदल्या दिवशी त्याने उंटावर जी सवारी केली होती ती त्याला आठवली. ओमर चुपचाप मिस्टर मूनलाइट च्या मागे चालला होता.

अचानक सलीम उत्साहाने उठला. तेव्हा तो पडता पडता वाचला. त्याने घाईने ओमरची दोरी एका हातात पकडली आणि मिस्टर मूनलाईटची दुसऱ्या हातात. मग तो त्यांना घेवून परत शेतात गेला. “अब्बा!” सलीमने जोरदार आवाज दिला.

“जरा, वेळेचे भान ठेव.” अब्बा हसत म्हणालले, “काय अजून नांगरणी करायची आहे का?”.

हो, सलीम म्हणाला. “तुम्ही मला परत एकदा शेत नांगरायलला परवानगी द्यात का? मिस्टर मूनलाईट, ओमर, आणि मी आम्ही तिघे मिळून शेत नांगरू.”

अब्बानी बघितत्रे सलीम काम करण्यास खूप उत्सुक होता. त्यांनी म्हटले, “नांगर बाळा,पण जरा लवकर कर. त्यामुळे ओमर दुसऱ्यांदा रागवणार नाही हे बघ!”

र्‌

7-५.“

सल्लरीमने दुसऱ्यांदा ओमरला नांगराला बांधले. त्याने ओमरच्या पुढे मिस्टर मूनलाइटला एका मोठ्या दोरीने बांधले. मग सलीमने नांगराच्या हान्डेलला दोन्ही हाताने धरले. त्यानंतर त्याने उंटाला सांगितले, “ओढ ओमर! ओढ त्याने गाढवाला सांगितले, “पुढे चल, मिस्टर मुनलाईट पुढे चल.!”

हळू-हळू करून पिवळे गाढव आणि उंच उंट एका सरळ रेषेत शेतात पुढे गेले. सल्ीमने नांगराला कसून जमिनीत दाबून ठेवले. ते गव्हाच्या शेतात दुसऱ्या टोकापर्यंत पोहचून परत आले. नांगराच्या टोकांमुळे जमीन दोन भागात विभागली गेली.

4. "८.

सल्लीमच्या अब्बानी जमिनीची इतकी सुंदर नांगरणी खूप आश्चर्याने पाहिल्री. यावेळच्या नांगरणीमुळे बी लावणीसाठी चांगली खोल सरी तयार झाली होती. विशेष गोष्ट म्हणजे ती सरळ रेषेत होती. सलीमच्या अब्बांना अशीच नांगरणी हवी होती.त्यांनी इतकी खोल आणि साधी सरळ नांगरणी कधीच पाहिली नव्हती.

“सलीम!” त्यांनी आनंदाने हाक मारत म्हटले, “खूप छान!”

हे ऐकून सलीमला खूप आनंद झाला कारण त्याच्या अब्बांना आता कधीच नांगर ओढावा लागणार नाही.

सलीम आनंदाने ओरडू लागला. जेव्हा तो ओरडत होता.तेव्हा मिस्टर मुनलाईट त्याचे ओले नाक सल्ीमच्या खांद्यावर रगडत होता. सलीमने आपल्ने दोन्ही हात मिस्टर मूनलाईटच्या गळ्यात घातले आणि प्रेमाने त्याला कुरवाळले. सल्लीमने ओमरच्या कानात काहीतरी सांगितले, ज्यामुळे ओमर शांत झाला.

असे अनोखे दृश्य -गाढव आणि उंटाकडून शेत नांगरण्याचे दृश्य आजही आपल्याला मोरक्कोट पाहायला मिळू शकते..

यी

२१%%ळ%ळे » हे